बर्मिंगहम : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला असली तरी त्याने दुसऱ्या गेममध्ये २१-९ असे झोकात पुनरागमन केले होते. त्यानंतर तिसऱ्या गेमममध्येही त्याने आघाडी घेतली होती आणि ही आघाडी त्याने कायम ठेवली होती.

लक्ष्य सेनला अंतिम फेरीत मलेशियाच्या एनजी यी याँगचे आव्हान होते. सेनने पहिल्या गेमममध्ये सुरुवातीला चांगले गुण कमावले होते. सुरुवातीपासूनच तो आक्रमक खेळ करत होता. लक्ष्य सेनने सुरुवातीला ५-४ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंततर यॉंगने दमदार कामगिरी केली आणि पहिल्या गेममध्ये ७-७ अशी बरोबरी केली होती. पण त्यानंतर सेन पुहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळाले. कारण याँगने यावेळी दमदार आक्रमण केले आणि पहिला गेम जिंकला. त्यामुळे सेनवरील दडपण वाढले होते. पहिला गेम सेनला १९-२१ असा गमवावा लागला. पण दुसऱ्या गेममध्ये त्याने जोरदार पुनरामगन केले. दुसरा गेम सेनने २१-९ असा जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.

सिंधूने केली सुवर्णपदकाची बोहनी… भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले.

सिंधूला पहिला पॉइंट घेता आला नसला तरी तिने यावेळी पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. सिंधूने त्यानंतर १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर सिंधूने ३-१ आणि ४-२ अशी आघाडी कायम ठेवली होती. पण त्यानंतर मिचेलने काही पॉइंट्स कमावत सिंधूच्या जवळ येण्याच्या प्रयत्न केला होता. पण सिंधूने तरीही ७-६ अशी आघाडी ठेवली होती. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळ केला आणि १५-९ अशी मोठी आघाडी पहिल्या गेममध्ये मिळवली होती. सिंधूने ही आघाडी १९-१५ अशी वाढवली आणि त्यानंतर पहिला गेम जिंकला.

भारताच्या लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. सेनला एक गेम पराभूत व्हावे लागले. पण त्याने हार मानली नाही आणि सामना जिंकत थेट अंतिम फेरी गाठली. बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर असलेल्या सेनने सिंगापूरच्या जिया हेंग तेहविरुद्ध वर्चस्वपूर्ण सुरुवात केली होती. मात्र, सेनने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत २१-१०, १८-२१,२१-१६ असा विजय मिळवला. सेन म्हणाला होता की, “मी दुसर्‍या सामन्यात मला खेळ नीट जमत नव्हता. पण मी शेवटी नीट खेळण्यात यशस्वी ठरलो. पहिल्या गेममध्ये प्रेक्षकांच्या पाठिंब्याने ही खूप मदत केली”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here