Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 8, 2022, 4:49 PM

shailesh lodha instagram story छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. आजवर मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळे ही मालिका तब्बल १४ वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील प्रमुख अभिनेत्यांनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना धक्के बसले.

 

shailesh lodha and asit modi

हायलाइट्स:

  • ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ पुन्हा चर्चत
  • असित मोदींचं वक्तव्य
  • शैलेश लोढांचा पलटवार
मुंबई: गेल्या १४ वर्षांपासून घराघरांत पाहिली जाणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. इतक्या वर्षात या मालिकेनं प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलंय. १४ वर्षाच्या या काळात मालिकेत अनेक बदल झाले. काही नव्या कलाकारांचा प्रवेश झाला; तर काही लोकप्रिय कलाकारांनी ही मालिका सोडली. पण मालिका अविरत सुरू राहिली.
लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळासंदर्भात शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य,वादाला तोंड फुटण्याची शक्यता
अलीकडंच तारक मेहता ही भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनीही या मालिकेला रामराम ठोकला. शैलेशच्या मालिका सोडण्याबाबत निर्माते म्हणाले, ‘मी कायम सगळ्यांना जोडून ठेवायचा प्रयत्न करतो. पण एखाद्याला सोबत राहायचं नसेल आणि आता काही नवं करायचं असेल तर त्यांनी फक्त ‘तारक मेहता…’पर्यंत मर्यादित राहू नये. कोणाच्याही जाण्यामुळं मालिका थांबणार नाही. प्रेक्षकांना आनंदी ठेवणं हाच आमचा उद्देश आहे.’ त्यामुळं मालिकेतील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार त्यातून बाहेर पडत असले तरीही मालिका सुरूच राहणार असल्याचं समजतं.
विवियन रिचर्ड्स यांच्याबद्दल स्पष्टच बोलल्या नीना गुप्ता, मला त्यांची चीड…
निर्माते असित मोदी यांच्या या वक्तव्यानंतर शैलेश लोढा यांनी एका कवितेतून त्यांना टोला लगावलाय. शैलेश यांनी इन्स्टाग्रास्टोरीवर ही कविता शेअर केलीय. त्यांनी त्यांचं म्हणणं असित मोदींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.

शैलेश यांनी इन्स्टास्टोरीवर लिहिलं आहे की, तुझं आणि माझं नातं असंचं होतं. मी नेहमीच मनानं आणि तू मात्र डोक्यानं विचार केला.( ‘तेरे मेरे रिश्ते का यही एक हिसाब रहा, मैं दिल ही दिल रहा तू सदा दिमाग रहा. #शैलेश की शैली.)

shailesh lodha post


का सोडली मालिका?
शैलेश लोढा यांनी मालिकेच्या निर्मात्यांना दिलेल्या तारखांचा योग्य वापर न केल्यानं अनेक चांगल्या कामाच्या ऑफर नाकाराव्या लागल्या होत्या. त्यामुळं त्यांचं आर्थिक नुकसान झाल्यानं ते नाराज होते. याच नाराजीमधून त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here