लातूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी प्रेम आणि आदर कायमच राहील, मात्र औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या नेतृत्वाला कंटाळलो आहे, असं सांगत शिवसेनेच्या माजी लातूर जिल्हाप्रमुखाने ठाकरेंची साथ सोडली. बळवंत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत असल्याचं जाहीर केलं. जाधव हे माजी मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते (Diwakar Raote) यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.

काय म्हणाले बळवंत जाधव?

“चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वावर मी नाराज आहे. त्यांनी लातूरमध्ये शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंबद्दल माझे प्रेम आणि आदर कायम राहील. सेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत” असे जाधव म्हणाले. माजी मंत्री दिवाकर रावते यांचे ते जवळचे नेते मानले जातात.

हेही वाचा : महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ, कट्टर शिवसैनिक दीड महिन्यात शिंदे गटात
शिवसेनेचे माजी लातूर जिल्हाप्रमुख

शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससारख्या पक्षांशी युती करायला नको होती, कारण शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आदर्श यांच्याशी ते विसंगत आहे, असा दावा जाधव यांनी केला. बळीराम जाधव हे २००० ते २००३ दरम्यान शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख, तर २०१६ ते २०१८ या काळात जिल्हा समन्वयक होते.

हेही वाचा : हरिभाऊ बागडेंना मतदारसंघातच झटका, ३० वर्षांची सत्ता महाविकास आघाडीने उलथवली

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेला धक्का

आदित्या ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पाचोरा तालुक्यातील कट्टर शिवसैनिक तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्यासह १०० समर्थकांनी मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी रावसाहेब पाटील यांच्यासह संपूर्ण जिल्हा परिषदेचा गट शिंदे गटात सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महादेवाच्या पिंडीवर हात ठेवून निष्ठेची शपथ घेतली होती. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच ते शिंदे गटात सहभागी झाल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : जे ठाकरेंना दोन वर्षात जमलं नाही, ते शिंदेंनी आठ दिवसात केलं, भाजप खासदाराने डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here