अनुभवी शरथ कमलने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकून अंतिम फेरीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा ४-१ असा पराभव करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व वाढवले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर, शरथने २९ वर्षीय चपळ पायाच्या ब्रिटनचा ११-१३, ११-७, ११-१२, ११-६, ११-८ असा पराभव करून पोडियमवर अव्वल स्थान पटकावले. शरथने २००६ मध्ये या स्पर्धेत पदार्पण केल्यापासून राष्ट्रकुलमधील त्याच्या एकूण पदकांची संख्या १३ वर नेली आहे.
सिंधूने केली सुवर्णपदकाची बोहनी…भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने दमदार कामगिरी करत भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले. यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यामुळे तिचे हे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने २१-१५ असा जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने दमदार कामगिरी केली आणि जेतेपद पटकावले. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी १९-१५ अशी वाढवली आणि त्यानंतर पहिला गेम जिंकला. त्यानंतर दुसरा गेमही जिंकत सुवर्णपदक पटकावले होते.
लक्ष्य सेनने पटकाववे होते दुसरे सुवर्णभारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला असली तरी त्याने दुसऱ्या गेममध्ये २१-९ असे झोकात पुनरागमन केले होते. त्यानंतर तिसऱ्या गेमममध्येही त्याने आघाडी घेतली होती आणि ही आघाडी त्याने कायम ठेवली होती. लक्ष्य सेनला अंतिम फेरीत मलेशियाच्या एनजी यी याँगचे आव्हान होते. सेनने पहिल्या गेमममध्ये सुरुवातीला चांगले गुण कमावले होते. सुरुवातीपासूनच तो आक्रमक खेळ करत होता. लक्ष्य सेनने सुरुवातीला ५-४ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंततर यॉंगने दमदार कामगिरी केली आणि पहिल्या गेममध्ये ७-७ अशी बरोबरी केली होती. पण त्यानंतर सेन पुहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्याचे पाहायला मिळाले. कारण याँगने यावेळी दमदार आक्रमण केले आणि पहिला गेम जिंकला. त्यामुळे सेनवरील दडपण वाढले होते. पहिला गेम सेनला १९-२१ असा गमवावा लागला. पण दुसऱ्या गेममध्ये त्याने जोरदार पुनरामगन केले. दुसरा गेम सेनने २१-९ असा जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.
सात्विक आणि चिरागने पटकावले तिसरे सुवर्णभारताने आज बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाची हॅट्रीक साजरी केली. भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांनी पुरुषांच्या दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.