औरंगाबाद: मुंबई: सरकार स्थापनेला जवळपास सव्वा महिना उलटल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. मंत्री आणि पालकमंत्री नसल्यानं लोकांची कामं खोळंबली आहेत. विरोधक सातत्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत आहेत. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस यांनी ठाण्यात जाऊन शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली.

मंत्रिपदांसाठी भाजपकडून ९ जणांची नावं निश्चित झाली आहेत. तर शिंदे गटाकडून ६ जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यावर शिवसेनेचे एकूण ४० आमदारांनी त्यांना साथ दिली. यापैकी ९ जण मंत्री होते. या सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्याच टप्प्यात संधी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र उद्या सहा जणांनाच शपथ दिली जाईल असं कळतं. अब्दुल सत्तार यांचं नाव टीईटी घोटाळ्यात आलं आहे. त्यामुळे सत्तार उद्या शपथ घेणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
कोण होणार मंत्री? भाजपमध्ये वेगवान घडामोडी; एक अलिखित नियम अन् झटक्यात ४ जणांचा पत्ता कट?
शिंदेंची ‘ती’ लाईन आणि सत्तारांचा पत्ता कट
बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारं हे सरकार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार म्हटलं आहे. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या हिंदुत्त्वाच्या वाटेनं जात आहोत, असं शिंदे बंडाच्या पहिल्या दिवसापासून सांगत आहेत. शिंदे यांच्या या विधानांचा संबंध सत्तार यांचा पत्ता कट होण्याशी लावला जात आहे.

सरकार शिंदेंचं, पण पॅटर्न फडणवीसांचा
देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम मंत्री नव्हता. आता शिंदे यांचं सरकार आहे. मात्र त्यात फडणवीस पॅटर्न पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे फडणवीस पॅटर्न रिपीट होताना दिसत आहे.
चर्चा मंत्रिमंडळ विस्ताराची, पण भाजपनं दीर्घकाळची रणनीती आखली; शेलारांवर मोठी जबाबदारी?
भाजपचं कट्टर हिंदुत्त्व
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात भाजपचा एकही आमदार मुस्लिम नाही. तिकिट वाटपात भाजपनं मुस्लिमांना बाजूला सारलं. केंद्रीय मंत्रिमंडळात मुख्तार अब्बास नक्वी यांच्या रुपात एकमेव मुस्लिम चेहरा होता. मात्र गेल्याच महिन्यात त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या एकही मुस्लिम चेहरा नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here