हिंगोली : हिंगोलीत आज आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत बांगरांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगरांचा ‘बाहुबली अवतार’ पाहायला मिळाला. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना चक्क क्रेनने हार घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. नांदेड येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री हिंगोलीत बांगरांसोबत कावड यात्रेत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री कावड यात्रेसाठी हिंगोलीत येणार आमदार संतोष बांगर यांनी जोरदार तयारी केली होती. नांदेडचे कार्यक्रम आवरुन मुख्यमंत्र्यांचं ठरल्याप्रमाणे हिंगोलीत आगमन झालं. बांगरांनीही मुख्यमंत्र्यांचं दणक्यात स्वागत केलं. १५१ किलो खोबऱ्याचा हार घालून, पुष्पवृष्टी करत बांगरांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनीही बांगर माझा ढाण्या वाघ असल्याचं सांगत उपस्थितांमध्ये जान भरली. भाषण सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर धनगर समाज, बंजारा समाज, यांच्यासह इतर समाज बांधव पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंधू शिवसेनेत, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, म्हणाले-आपली ताकद वाढली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांचे तोंडभरून कौतुक केले. संतोष बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता, असं पहिल्यांदाच थेटपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी गुपित फोडलं.

करारी, आक्रमक, ठाकरेंना अंगावर घेणाऱ्या नितेश राणेंना लॉटरी, कॅबिनेटमध्ये संधी?
विरोधकांना आपण आपल्या कार्यातून उत्तर देणार आहोत. मी जिथे जातोय तिथे हजारोंच्या संख्येने नागरिक सत्कार करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे सरकार आहे. अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला होतं. शिवसेना भाजपा युतीसाठी जनतेने भरभरून मतदान दिलं होतं, सेना भाजप युतीचे सरकार येईल ही जनतेची अपेक्षा होती. ज्या लोकांना बाळासाहेबांनी कधी जवळ उभं केलं नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं हे दुर्दैवी आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करतोय, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय. मग आमचं काय चुकतंय?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.

औरंगाबादच्या ६ आमदारांनी साथ सोडली, पण दानवे ठाकरेंसोबत राहिले, निष्ठेचं रिटर्न गिफ्ट मिळालं, विरोधी पक्षनेतेपदी संधी!
कावड यात्रेचं महत्त्व

विविध नद्यांमधून पाणी आणायचं आणि त्याचा शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा. कावडीतून पाणी आणताना पिंडीतून अभिषेक होईपर्यंत कावड खाली ठेवायची नाही, असा नियम आहे. परशुरामाने ही यात्रा सुरु केली, अशी आख्यायिका आहे. हजारो शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी होत असतात. कळमनुरी येथून ही यात्रा हिंगोलीकडे मार्गस्थ झालीये. यंदाच्या साली या यात्रेत संतोष बांगर सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष आसमंतात निनादत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here