हिंगोली : “आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका”, अशी जाहीर धमकी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दिली. परवा इकडे काही लोकांनी सभा सभा घेतली… ती काय सभा होती का… सभा कशाला म्हणतात, असं म्हणत समोरील गर्दीकडे त्यांनी बोट दाखवताच उपस्थित शिंदे गटातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.

हिंगोलीत आज आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत बांगरांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगरांचा ‘बाहुबली अवतार’ पाहायला मिळाला. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांना चक्क क्रेनने हार घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी झालेल्या सभेत संतोष बांगर आणि एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषणे ठोकत ठाकरे गटावर हल्ला चढवला.

राष्ट्रवादीच्या आमदाराचे बंधू शिवसेनेत, उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधलं, म्हणाले-आपली ताकद वाढली
“आपल्याला डिवचण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका”, अशी धमकी संतष बांगरांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना दिली.

कावड यात्रेत संतोष बांगरांचा बाहुबली अवतार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बघत राहिले!
संतोष बांगर बाळासाहेबांचा ढाण्या वाघ- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांचे तोंडभरून कौतुक केले. संतोष बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता, असं पहिल्यांदाच थेटपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी गुपित फोडलं.

विरोधकांना आपण आपल्या कार्यातून उत्तर देणार आहोत. मी जिथे जातोय तिथे हजारोंच्या संख्येने नागरिक सत्कार करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे सरकार आहे. अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला होतं. शिवसेना भाजपा युतीसाठी जनतेने भरभरून मतदान दिलं होतं, सेना भाजप युतीचे सरकार येईल ही जनतेची अपेक्षा होती. ज्या लोकांना बाळासाहेबांनी कधी जवळ उभं केलं नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं हे दुर्दैवी आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करतोय, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय. मग आमचं काय चुकतंय?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here