येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही दापोली तालुक्यात पालगड येथे नळपाणी योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदीप सुर्वे,भगवान घाडगे, प्रकाश कालेकर, रोहिणी दळवी, संतोष दळवी, अनंत वाजे,राजेंद्र फणसे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बदल्यात राजकिय परिस्थितीतही आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरू ठेवत, विकासकामांची काळजी करू नका हे सरकार आपले आहे युतीचे सरकार आहे, असे सांगून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अधिकचे बळ देण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले.
‘अनिल परब यांचेच षड्यंत्र’
दुर्देवाने आपल्या शिवसेनेचेच पालकमंत्री अनिल परब पक्ष संपवायला निघाले होते. परिवहन मंत्री असताना परिवहन खात्याचे काहीही काम करायचे नाहीत. फक्त योगेश कदम संपवून मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे कारस्थान करून रामदास कदम व योगेश कदम विरोधात षडयंत्र रचण्याच्या बैठका मुंबईत अनिल परब घेत होते, असा घणाघाती आरोपही आमदार योगेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल परब यांनी मतदारसंघात संघटनेत केलेले फेरबदल हाच विषय येथील राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू असेल हे स्पष्ट आहे.
‘साने गुरुजींचे राष्ट्रीय स्मारक उभे राहील’
परमपूज्य साने गुरुजींच्या पालगड या गावी राष्ट्रीय स्मारक, व येथील नळपाणी योजना अशा दोन मोठया कामांचा शब्द दिला होता. मागील सरकारमध्ये निधी मिळू शकला नाही पण आता ससरकार आपले या संधीचा उपयोग मतदारसंघातील विकासासाठी करू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. पालगड येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे भूमिपूजन समारंभात त्यांनी केलेल भाषण चर्चेत राहीले आहे.
खासदार सुनील तटकरेंवरही साधला निशाणा
ही विकासकाम करताना माझ्याकडून कोणताही प्रोटोकॉल चुकणार नाही राजकिय शिष्टाचार पाळला जाईल असे स्पष्ट करत त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला.भूमिपूजन पाटीवरून नाव काढा हे मी कधीही सांगितले नाही पण हे तुम्ही केलत आमदाराचे म्हणजे माझे नाव डावलून माजी राष्ट्रवादीच्या आमदाराचे नाव पाटीवर लावलेत अशा शब्दात त्यांनी तटकरे यांचाही समाचार घेतला. विकासकामे करताना हे असली राजकारण कधीही आपल्याकडुन होणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आहेत त्याचा उपयोग शिवसैनिकांनाच होणार आहे प्रसंगी आपण थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून विकासकाम मंजूर हा विश्वास मला आहे याचा उपयोग आपल्याला सगळ्यांनाच होणार आहे आशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times