अमरावती : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढलं आहे. जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत काही ठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले दोन भाविक वाहून गेल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. तसंच जिल्ह्यात दोन दुचाकी आणि एका चार चाकी वाहनालाही जलसमाधी मिळाली आहे.

मूर्ती मोर्शी शहरातील मध्यभागातून वाहणाऱ्या नलदमयंती नदीच्या पुरात ३५ वर्षीय युवक दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाहून गेला. काही अंतरावर चारचाकी वाहन आणि या युवकाचा मृतदेह आढळला आहे. नदीच्या पुलावर असलेल्या आठवडी बाजाराकडून पेठ पुराकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे शहरातील गिट्टी कदम भागात सदर युवक आठवडी बाजारात गेला होता. मात्र परतीच्या प्रवासात दमयंती नदीच्या पुलावर तो आला आणि पुराच्या पाण्यात वाहून गेला.

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार; अर्थ-गृह खात्यासाठी शिंदे गट- भाजपकडून रस्सीखेच

दुसरीकडे, वरुड तालुक्यातील स्वपनदीमध्ये सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एक जण वाहून गेला. अमरावती जिल्ह्यात श्रावणी सोमवारनिमित्त श्री. क्षेत्र सालबर्डी येथे शिव गुपित असलेल्या शिवलिंगावर बेलपत्र वाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. अशातच भाविकांच्या दोन दुचाकी आणि एक चार चाकी वाहन सालबर्डी येथे गंगामिळ संगमापासून मांडू नदीच्या पुरात वाहून गेले.

दरम्यान, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here