CM Eknath Shinde reveals secret | हिंगोलीत काल आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत बांगरांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगर यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना क्रेनने हार घालून त्यांचे स्वागत केले.
हायलाइट्स:
- संतोष बांगर हे माझे चेले आहेत
- बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे
- ते आमच्यासोबत कसे नाहीत, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता
संतोष बांगर हे माझे चेले आहेत. बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. ते आमच्यासोबत कसे नाहीत, असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. एवढेच नव्हे तर संतोष बांगर बाहेर राहून आमच्यावर टीका करत होते. त्यामुळे लोकांची त्यांच्याविषयीची धारणा वेगळीच झाली होती. मात्र, संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गोटात राहून एक-एक आमदार आमच्याकडे पाठवत होते. त्यांनी योग्यवेळी आपले पत्ते उघडले आणि गरजेच्या प्रसंगी ते आमच्यासोबत उभे राहिले, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळमनुरी येथील लमाण देव व आदिवासी भवनासाठी १० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
संतोष बांगर यांचा शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा
“आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका”, असा सज्जड इशारा आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दिला. आपल्याला डिवचण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो, आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू. त्यामुळे आमच्या नादी लागू नका”, असेही संतोष बांगर यांनी सांगितले.
हिंगोलीत काल आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कावड यात्रेत बांगरांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगर यांच्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी परिसरात प्रचंड प्रमाणात गर्दी आणि उत्साह पाहायला मिळाला. संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना क्रेनने हार घालून त्यांचे स्वागत केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.