पोलिसांनी बारकाईने मृतदेहाची पाहणी करत असताना घटनास्थळी हजर असलेल्या जमादार सुभाष चव्हाण यांना मृतदेह पाहता क्षणी तरुणाची ओळख पटली. जमादार चव्हाण यांनी सदर मृतदेह हा पांगरी (ता. हिंगोली) येथील हरीदास वकृजी टापरे याचा असल्याचं सांगितले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि युवकाचा अनैतिक संबंधातून खून झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
कसा झाला खुनाचा उलगडा?
या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. आरोपींनी अनैतिक संबंधाच्या कारणामुळे हरदीस टापरे याच्या डोक्यावर आणि मानेवर जोरदार वार करत त्याला जीवे मारले. तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वाहनाद्वारे घटनास्थळापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर टाकला. परंतु पोलिसांनी या खुनाचा २४ तासांत उलगडा करत आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, याप्रकरणी मुलगा अरविंद हरीदास टापरे याच्या फिर्यादीवरून आरोपी व्यंकटी गोविंदा मस्के, ज्ञानेश्वर बबन गिरे, संतोष नामदेव बानबुडे, आशाबाई बबन गिरे (सर्व रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी दिली.