Kolhapur Rain Update Today : कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९५.३३ टक्के भरला असून १६०० क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या विद्युत विमोचन मधून सुरू आहे.

पंचगंगा नदी पात्राबाहेर…
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी काल दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. आज सकाळी ८ वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३६ फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदी आपली इशारा पातळी गाठण्यासाठी ३ फूट कमी आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाली असून प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.