Maharashtra Cabinet Expansion | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी संजय राठोड हे आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर गेले होते. त्यानंतर साडेनऊ वाजता राठोड हे सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीलाही पोहोचले आहेत. संजय राठोड हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग करत असल्याचे चित्र दिसत आहे.

हायलाइट्स:
- शिंदे सुरतला निघून जाण्यापूर्वी संजय राठोड हे सतत त्यांच्यासोबत वावरत होते
- बंजारा समाजात संजय राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये संजय राठोड यांचे मंत्रिपद पक्के मानले जात होते
मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने नव्या सरकारमध्ये कलंकित मंत्री नको, अशी भूमिका घेतली होती. ठाकरे सरकार असताना एका प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परिणामी भाजपश्रेष्ठींच्या भूमिकेमुळे संजय राठोड यांची मंत्रिपदाची संधी हुकणार, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, संजय राठोड हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी संजय राठोड हे आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर गेले होते. त्यानंतर साडेनऊ वाजता राठोड हे सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीलाही पोहोचले आहेत. त्यामुळे संजय राठोड हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लॉबिंग करत असल्याचे चित्र दिसत आहे.
तर कालच टीईटी घोटाळा प्रकरणात अडकलेले आमदार अब्दुल सत्तार हेदेखील मंत्रिपदासाठी अजूनही प्रयत्नशील आहेत. ते मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीला उपस्थित होते. अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून या दोघांना मंत्रिपद देण्यासाठी विनंती केली जात आहे. परंतु, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. कदाचित त्यांना मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारात कॅबिनेटमध्ये सामावून घेतले जाऊ शकते. मात्र, हे दोन्ही नेते मंत्रिपद मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपली ताकद पणाला लावताना दिसत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network