मात्र, या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील आणि स्वत: संजय शिरसाट यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत नाराजीच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे मंत्री आले होते, त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटात नाराजी वगैरे काही नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले. तर संजय शिरसाट यांनी आपण नाराज असल्याचे वृत्त धडाकवून लावले. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना काही अडचणी येतात, काही लोकांन सामावून घ्यावे लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भविष्यात दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी आज आमची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी आम्हाला भविष्यात कशाप्रकारे काम करायचे आहे, हे समजावून सांगितले. प्रत्येक आमदाराने मतदारसंघात जाऊन काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोणाला संधी ?
भाजप : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा
शिंदे गट : दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, संजय राठोड, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार