संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिनचिट दिली होती. पोलिसांच्या क्लिनचीट नंतरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच चित्रा वाघ यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया विचारली असता, “कुणाचं काही मत असेल, कुणाचं काही सांगणं असेल, तर त्यांचं मत विचारात घेतलं जाईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

संजय राठोड यांच्या मंत्रिपदाची दुसरी कारकीर्द प्रचंड अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी सकाळी संजय राठोड यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारासाठी अंतिम झाल्यानंतरच प्रचंड टीकेची झोड उठली. संजय राठोड यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताच या टीकेचा जोर आणखीनच वाढला. शिंदे गट आणि भाजप सध्या एकत्र सरकारमध्ये आहेत. मात्र, राठोडांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच क्षणाला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. इकडे माजी मंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राठोड यांच्यावर टीका केली.
राठोडांना मंत्रिपद दिल्याने विरोधकांच्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांनी संजय राठोड यांना क्लिनचिट दिली होती. पोलिसांच्या क्लिनचीट नंतरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच चित्रा वाघ यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया विचारली असता, “कुणाचं काही मत असेल, कुणाचं काही सांगणं असेल, तर त्यांचं मत विचारात घेतलं जाईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.
राठोड मंत्री होणं हे दुर्दैवी, चित्रा वाघांची तळपायाची आग मस्तकात
संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाल्यानंतर त्यांची शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात वर्णी लागते का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. अखेर स्थानिक आणि जातीय गणितं लक्षात घेऊन शिंदेंनी राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. यानंतर मात्र चित्रा वाघ यांची तळपायाची आग मस्तकात गेली. तिकडे राठोड शपथ घेत होते, अन् इकडे चित्रा वाघ त्यांच्यावर बरसत होत्या.
पुजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास… लडेंगे… जितेंगे, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.