व्हायरल झालेल्या या प्रोममध्ये सोनम तिच्या भावाची म्हणजेच अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे. या दोघांनाही करण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारतोय.
करण सोनमला विचारतो की, सध्या मॅन ऑफ द मूवमेंट कोण आहे? म्हणजे तुला काय वाटतं की सध्या कोणाची हवा आहे बॉलिवूडमध्ये? या प्रश्नावर सोनम म्हणते की, रणबीर बेस्ट आहे सध्या. जिथं तिथं मला तोच दिसतोय, अयान मुखर्जीच्या चित्रपटाचं प्रमोशन करताना. हे ऐकल्यानंतर करणनं सोनमला त्या चित्रपटाचं नाव विचारलं. त्यानंतर सोनम म्हणते की, ‘शिवा नंबर 1’. ब्रह्मास्त्र असं त्या चित्रपटाचं नाव असताना ‘शिवा नंबर 1’ ऐकूण करण आणि अर्जुन दोघांनाही हसू आवरता आलं नाही. दोघंही मोठमोठ्यानं हसत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायाला मिळतंय.
सोनमच्या या उत्तरानं नेटकऱ्यांना आयता विषय मिळाला आणि त्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली.
कॉफी विथ करण या शोमध्ये प्रेग्नंट असताना हजेरी लावणारी सोनम ही दुसरी अभिनेत्री आहे. करिनानं देखील प्रेग्नंट असताना या शोमध्ये आली होती. योगायोग म्हणजे तिनं सोनमसोबतच शोमध्ये हजेरी लावली होती.