Yogi Adityanath Threat : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ११२ या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवून मुख्यमंत्री योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करून त्यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

Yogi Adityanath Threat
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी; ‘तीन दिवसात बॉम्बने उडवून देऊ’

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री योग्य आदित्याथ यांना जीवे मारण्याची धमकी
  • तीन दिवासात बॉम्बने उडवण्याची धमकी
  • उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज पाठवून मुख्यमंत्री योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करून त्यांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आरोपीने आपले नाव शाहिद असे सांगून ३ दिवसात हा हल्ला करणार असल्याचे या आरोपीने सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एजन्सींनी तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशच्या मुख्यालयाच्या ११२ या व्हॉट्सअॅप नंबरवर एक मेसेज आला होता. त्यामध्ये योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा नंबर शाहिद खान नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समोर आले आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. व्हाॅटस्ॲप नंबरच्या आधारे पोलीस आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी लखनऊच्या गोल्फ सिटी ठाण्यात आरोपी शाहिद खानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार ते गोपीनाथ मुंडेंचा विश्वासू शिलेदार; मंत्री सुरेश खाडे यांचा राजकीय प्रवास
सुभाष कुमार यांनी निरीक्षण अधिकारी अंकिता दुबे यांना मुख्यमंत्री योगी यांना मिळालेल्या प्राणघातक धमकीची माहिती दिली. पोलिसांनी या मेसेजचा स्क्रीन शॉटही गुप्तचर यंत्रणांना दिला आहे. योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या आहेत.

आईच्या इच्छेसाठी शेवटपर्यंत केली नोकरी, श्रावण बाळासारखं जगले प्रदीप पटवर्धन

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here