औरंगाबाद : नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाल्यांचे नाव टीईटी घोटाळ्यात समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सत्तार यांच्या मुलीला सन २०१७ पासून ते आतापर्यंत वेतन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हीना कौसर अब्दुल सत्तार शेख ही मुलगी टीईटी परीक्षेत अपात्र असतानाही तिला पगार कसा काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या संदर्भात आता एक वेगळी चौकशी करण्याची मागणी होत आहे. कारण, शिक्षण विभागाच्या कागदपत्रनुसार २०१७ पासून ते जुलै २०२२ या महिन्यापर्यंत हिना कौसर अब्दुल सत्तार शेख यांनी पगार उचलला आहे.

Shocking Video: एक-दोन नव्हे तर तब्बल १४ महागड्या गाड्या पाण्यात तरंगल्या, सत्य समोर येताच सगळे हादरले
महिना ४० हजारांपेक्षा जास्त त्यांचा पगार आहे. खुद्द अब्दुल सत्तार यांनीच त्यांची मुलगी टीईटी परीक्षा अपात्र असल्याचं माध्यमांना पत्र दिलं होतं. जर त्या अपात्र होत्या तर मग त्या पगार कुठल्या निकषावर घेत होत्या? हाही प्रश्न या निमित्ताने समोर येतो.

दरम्यान, शाळेने वेतन बिल सादर केलं, त्यात त्या पूर्णतः पात्र असल्याचं दिसत आहे आणि म्हणून त्यांना पगार सुरू आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते. त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात, अशी माहिती वेतन अधीक्षक दिलीप जेऊळकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात शपथविधी सुरू असताना बिहारमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here