Accident Viral Video : जंगलात पावसामुळे अचानक पाणी वाढल्याने किमान १४ गाड्या वाहून गेल्या, तर ५० लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूर जिल्ह्यातील सर्व लोक रविवारी संध्याकाळी बलवारा पोलीस स्टेशन हद्दीतील कटकूट जंगलात सुकरी नदीजवळ सहलीचा आनंद लुटत होते. परिसरात पावसाने ओढ दिल्याने नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहलीसाठी गेलेली मंडळी आपला जीव वाचवण्यासाठी गाड्यांना जागेवरच सोडून जंगलात पळ काढला. यामध्ये तब्बल १४ गाड्यांचा समावेश होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने १० गाड्यांना बाहेर काढलं.
पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मदतीने काढल्या गाड्या…
पाण्याच्या प्रवाहात बऱ्याच गाड्या वाहून गेल्या तर एक पुलाच्या खांबाजवळ अडकली. या अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक पोलिसांना अशा ठिकाणी अचानक पाणी वाढण्याच्या धोक्याची माहिती देणारे फलक लावण्यास सांगितले आहे.