Solapur News : सोलापूरातील अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नदी पलीकडे असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाचे नागरीक अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करतात. अशीच एक मन सुन्नी करणारी घटना आज समोर आली आहे.

हायलाइट्स:
- कब्रस्तान नदी पलीकडे असल्याने नदीतून अंत्ययात्रा
- सोलापूरातील अक्कोलकोट तालुक्यातील मन सुन्न करणारा प्रकार
- नदीतून रिकाम्या बॅरलवरून घेऊन केला अंत्यसंस्कार
अनेक वर्षांपासून नदीवर पुलाची मागणी प्रलंबित
अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील ग्रामस्थांनी नदीवर पूल बांधा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. पण आजतागायत हरणा नदीवर पूल बांधले गेले नाही. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की हरणा नदीला पूर येतो. हरणा दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे नदीपलीकडे जाण्यासाठी पितापूर येथील नागरिक रिकाम्या बॅरलचा आधार घेत आहेत.
मुस्लिम कब्रस्तान नदीपलीकडे
मौजे पितापूर येथे मुस्लिम समाजाची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे. यामधील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीपलीकडे जावे लागते. पावसाळ्यात अंतिम संस्कार करण्यास जाताना प्राणपणाला लावावे लागते. ज्या व्यक्तींना पोहता येते तेच लोक नदीपलीकडे प्रेत घेऊन जातात. रिकाम्या बॅरलपासून एक छोटीशी नाव तयार करण्यात आली आहे. सर्व विधी संपन्न करून प्रेताला हार तुरे घालून नदीपर्यंत आणून सोडतात आणि रिकाम्या बॅरलवर ठेवून अंत्यसंस्कार करण्यासाठी पोहोत मुस्लिम कब्रस्तान येथे घेऊन जातात.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network