बीजिंग : करोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर मंकीपॉक्सने देशात चिंता वाढवली होती. पण आता एका भलत्याच आजाराने डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये आता झुनोटिक लंग्या (Zoonotic Langya) नावाचा व्हायरस सापडला आहे. तायवानच्या रोग नियंत्रण केंद्राकडून आलेल्या माहितीनुसार, या व्हायरसमुळे आतापर्यंत ३५ लोकांना संक्रमित केलं आहे. हा आजाराविषयी आणखी माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचीही माहिती आहे.

किती धोकादायक आहे Zoonotic Langya व्हायरस?

तायवानच्या सीडीसीचे उपमहानिदेशक चुआंग जेन-हिसियांना यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार माणसांमध्ये फैलावत असल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत यावर वैज्ञानिक तपास सुरू आहे, तोपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, स्वच्छता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Shocking Video: एक-दोन नव्हे तर तब्बल १४ महागड्या गाड्या पाण्यात तरंगल्या, सत्य समोर येताच सगळे हादरले
पाळीव प्राण्यांवर केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची माहिती देताना त्यांनी सांगितलं की, दोन टक्के शेळ्या आणि पाच टक्के कुत्र्यांना या विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे तुमच्याकडेही पाळीव प्राणी असतील तर सावधान राहण्याची गरज आहे.

चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लंग्या हेनिपाव्हायरसचा तीव्र संसर्ग असलेल्या ३५ रुग्णांची ओळख पटली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी २६ जणांना लंग्या विषाणूची लागण झाली होती.

‘तू चालू बाई आहे…’ म्हणताच विवाहितेनं बॉयफ्रेंडची केली निर्घृण हत्या, अशी सापडली पोलिसांना
चुआंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील ३५ रूग्णांची चौकशी केली असता ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते. इतकंच नाहीतर त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही विषाणूचा प्रसार दिसून आला नाही. अशा परिस्थितीत हा विषाणू माणसाकडून माणसात पसरण्याची शक्यता फारच कमी असल्याचं बोललं जात आहे.

लंग्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळतात

विषाणूची लागण झालेल्या २६ रुग्णांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या ही लक्षणे आढळून आली. त्यांच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाणही कमी झाल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे या गोष्टीही समोर आल्या.

पतीने गिफ्ट केला ‘होम मसाज’, व्यक्तीने घरी येताच पत्नीवर केला बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here