धुळे : देव तरी, त्याला कोण मारी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याच म्हणीचा प्रत्यय आला आहे, तो नंदुरबार जिल्ह्यातील विलन सोमा भिलावे यांना. विलन भिलावे यांच्यासाठी देवदूत ठरले आहेत धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर मुक्करम खान.

विलन भिलावे यांच्या उजव्या डोळ्यात तब्बल २४ तासांपासून साधारण ३ इंचापर्यंत चाकू अडकून पडला होता. विलन बिलावे या आदिवासी तरुणाच्या डोळ्यात घुसलेला चाकू यशस्वी शस्त्रक्रियेने काढून रुग्णाला जीवनदान देण्याचा चमत्कार धुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर असलेल्या देव दुतानीं केला आहे.

Shocking Video: एक-दोन नव्हे तर तब्बल १४ महागड्या गाड्या पाण्यात तरंगल्या, सत्य समोर येताच सगळे हादरले
अत्यंत दुर्मिळ असणारा हा प्रसंग धुळ्यातील प्रसिद्ध असलेले हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर मुक्करम खान आणि त्यांच्या स्टाफने अगदी सहजपणे हाताळला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी या रुग्णाला जीवनदान मिळाले आहे.

ही घटना काल सकाळच्या सुमारास घडल्यानंतर सुरुवातील विलन भिलावे याना तळोदा तालुक्यातील कोठला गावातून नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात आणले गेले. त्यांच्या डोळ्यात रुतलेला चाकू पाहून ठेतील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत विलन भिलावे याना धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. याठिकाणी भिलावे याना येत काल रात्री बराच उशीर झाला. रात्रीच हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी मीटिंग घेत सकाळीच भिलावे यांच्या डोळ्यातील रुतलेला चाकू काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि अत्यतं दुर्मिळ आणि रुग्णाच्या जीवावर बेतू शकणारी अशी किचकट शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने यशस्वी केली.

‘तू चालू बाई आहे…’ म्हणताच विवाहितेनं बॉयफ्रेंडची केली निर्घृण हत्या, अशी सापडली पोलिसांना

या दुर्मिळ आणि अत्यंत किचकट अशा शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला अनेक गोष्टींचा धोका निर्माण झाला होता. गुंतागुंतीच्या अशा या शस्त्रक्रिया दरम्यान रुग्णाची दृष्टी जाण्याची तसेच ब्रेन्ड हुमर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभाग प्रमुख असलेल्या डॉक्टर मुकरम खान यांनी कान नाक घसा या विभागातील डॉक्टरांना बोलावून घेत अत्यंत यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पाडून रुग्णाला जीवनदान दिले आहे.

चीनमध्ये सापडला आणखी एक जीवघेणा संसर्ग, ३५ लोकांमध्ये गंभीर लक्षणं, वाचा तुम्हाला किती धोका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here