मुंबई : संजय राठोड (Sanjay Rathod) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर विरोधकांसह भाजपमधूनही विरोधाचे सूर उमटत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोडांबरोबरच्या संघर्षाचा दुसरा अंकही सुरु केला. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी चित्राताईंना साद घालत एकत्र वस्त्रहरण करण्याची हाक दिली. मात्र हा विरोध सुरु असतानाच संजय राठोड यांच्यासाठी खातंही ठरल्याची बातमी आहे. संजय राठोड यांना शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे सरकारमध्ये संजय राठोड यांच्याकडे वनमंत्रालयाची जबाबदारी होती. एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राठोड यांच्या राजीनाम्यासाठी देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार आवाज उठवला होता. पण त्याच राठोडांच्या मांडीला मांडी लावून आता या नेत्यांना बसावं लागणार आहे. ज्यांच्यावर गंभीर झाले त्यांनाच पहिल्या कॅबिनेट विस्तारात स्थान दिलं गेलं.

हेही वाचा : आता महिला व बालविकास खातं संजय राठोडांना द्या, शिवसेनेने डिवचलं

संजय राठोड कोण आहेत?

संजय राठोड हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य आहेत. २००४ पासून ते सलग चौथ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांची राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांना महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. मंत्रीपदी नियुक्ती झाली त्यावेळी ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष होते. ३० डिसेंबर २०१९ रोजी ठाकरे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत.

हेही वाचा : चंद्रकांतदादांच्या जागी आशिष शेलार नाही, तर ‘या’ दिग्गजाला भाजप प्रदेशाध्यक्षपद
दोन वर्षांपूर्वी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आले. त्यानंतर भाजपने हा मुद्दा उचलून धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देत मंत्रिमंडळापासून दूर राहणे पसंत केले. ठाकरेंनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र विस्तार आणि फेरबदलात त्यांचे पुनरागमन झाले नाहीच. अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी झालेल्या संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळत आहे.

हेही वाचा : विखे पाटलांच्या प्रथम क्रमांकाचे गणित आणि पुढील समीकरणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here