डिजिटल युगात भीक मागण्याची पद्धतही बदलली आहे. काही भिकारी डिजिटल पद्धतीनं भीक मागू लागले आहेत. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले झुनझुन बाबा बरेच चर्चेत आहेत. पेटीएमवरून भीक मागणाऱ्या झुनझुन बाबांचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.

पेटीएमवरील मोबाईल नंबर मुलाचा असल्याची माहिती बाबांनी दिली. बाबांचा मुलगा शहराच्या कोपऱ्यात राहतो. पेटीएमवर जमा होणारी भीक तो बाबांना देतो. बाबांच्या नावे इंदूर आणि सागर जिल्ह्यात जमीन आहे. खमकुआमध्ये एक मंदिर आणि जमीनदेखील त्यांच्या मालकीची आहे. भीक मागून त्यांनी ही सगळी कमाई केली आहे. भीक मागून मी पैसे गोळा केले आणि मालमत्ता खरेदी केली. त्यात गैर काय, असा सवाल ते उपस्थित करतात. आता हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं ध्येय त्यांनी ठेवलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.