गुलाबराव पाटील यांची नात विराला आजोबांना काय गिफ्ट देणार असे विचारले असता, ‘चॉकलेट देणार’ असं विरा म्हणाली. तिच्या उत्तरावर घरात एकच हशा पिकली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी मायाबाई यांनी गुलालाची उधळण करत स्वत:च्या हाताने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबातील पत्नी, भाऊ, मुलगा, सून, नातवंडे, तसेच बहिणी व शालक या नातेवाईकांच्या चेहऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अंगणात एकमेकांना गुलाल लावून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आनंद साजरा केला. तसेच अंगणात फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. त्यांच्या जंगी स्वागतासाठी तयार केली जात असल्याचेही कुटुंबियांनी सांगितले.
गुलाबराव पाटील यांना तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळतयं याबाबत कुटुंबातील सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या असत्या, गुलाब भाऊंना मंत्रीपद मिळाल्याचा प्रचंड आनंद आहे. देव त्यांच्या हातून अशाच प्रकारे राज्याचा जिल्ह्याचा विकास घडवून असे कुटुंबातील गुलाबराव पाटील यांची पत्नी मायाबाई, बहिण ललीबाई तसेच भाऊ यांनी भावना व्यक्त केल्या.