Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Aug 9, 2022, 6:29 PM

छोट्या पडद्यावरची ‘देवमाणूस’ ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत अ सते. पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर मालितेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे.

 

kiran dange devmanus
मुंबई: टीव्ही सृष्टीत एखादीच मालिका असते ज्या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळतं, पण त्याच सोबत टीकाही होते. अशीच एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. मालिकेचं पहिलं पर्व हिट ठरल्यानंतर दुसऱ्यापर्वाकडं प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं होतं. परंतु कथानकात ट्वीस्ट आले की मालिका पुन्हा चर्चेत आली. ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
नावाला सेलिब्रिटी जनरल नॉलेजचा पत्ताच नाही…सोनमचं उत्तर ऐकून लावाल डोक्याला हात

अजितकुमार देव उर्फ देवी सिंग उर्फ नटवर सिंगला आता त्याच्या पापांची शिक्षा मिळणार असं दिसतंय. या नराधमाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर येणार आहे. पण मालिकेत अचानक मोठा ट्वीस्ट आल्यानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसलाय. ज्या माणसानं देवी सिंगला देवमाणूस बनवलं त्याच माणसाचा म्हणजेच बज्याचा खून झाल्याचं मालिकेत दाखण्यात आलं. देवीसिंगचं सत्य बज्याला समजतं. त्यामुळं नराधम बज्याचा देखील खून करतो.

गृहिणी आणि वयस्कर मंडळींना डोळ्यासमोर ठेवत चॅनेल लढवतायत ही शक्कल
मालिकेत बज्याला आता कायमचाच आराम मिळाला आहे. देवमाणूस मालिकेत बज्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण डांगे यानं त्याचा शेवटचा सीन कसा शूट झालाय याची एक झलक प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. किरणसाठी हा अत्यंत भावुक असा क्षण होता. या मालिकेमुळं तो खऱ्या अर्थानं घराघरांत पोहोचला आहे. त्याच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलंय. पण आता किरणचा या मालिकेतला प्रवास संपला आहे.

नाम्या बज्याची दोस्ती
मालिकेत नाम्या-बज्याच्या मैत्रीनं प्रेक्षक अनेकदा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पण आता देवी सिंगमुळं नाम्याचा जिगरी दोस्त त्याला सोडून गेलाय. विशेष म्हणजे मालिकेत खास दोस्त असलेले हे दोघं खऱ्या आयुष्यातही बेस्ट फ्रेंड आहेत. त्यामुळं बज्या शेवटचा सीन शूट करत असताना नाम्यानं त्याला घट्ट मिठी मारल्याचं पाहायला मिळालं.


Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here