Mumbai – Ahmedabad highway accident : मुंबई – अहमदाबाद महामार्गावर लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Mumbai - Ahmedabad highway accident
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रकला भीषण धडक; लक्झरीचा चक्काचूर, तिघे जखमी

हायलाइट्स:

  • मुंबई – अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
  • चारोटी उड्डाणपुलावर लक्झरी बसची ट्रकला धडक
  • भीषण अपघातात तीन जण जखमी
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लक्झरी बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपूलावर गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मर्गिकेवर एक नादुरुस्त ट्रक उभा होता.

भरधाव लक्झरी बसने उभ्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की लक्झरी बसचा पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला व बस चालकाचे दोन्ही पाय स्टेरिंगखाली अडकून राहिले. घटनेची माहिती मिळताच चारोटी महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले व क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस व ट्रक बाजूला सारून बस चालकाला बाहेर काढण्यात आले. दोन प्रवासी देखील या अपघातात जखमी झाले असून अपघातातील जखमी तिघांनाही कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ी

आदित्य ठाकरेंचं पर्यावरण खातं रोखठोक बोलणाऱ्या आक्रमक नेत्याला, एकनाथ शिंदेंचा डाव!

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here