मुंबई: शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज संपन्न झाला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक दिवसांपासून रखडला होता. अखेर आज १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्या ९ जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ जणांपैकी ६ जण म्हणजेच एक तृतीयांश नेते हे दलबदलू आहेत.

राजकारणात आता पक्षनिष्ठा, मूल्यं, नितीमत्ता, विचारसरणी कितपत राहिली आहे हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षांत तर दलबदलूंची संख्या खूपच वाढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरं होत आहेत. विशेष म्हणजे या नेत्यांना मंत्रिपदं, तपास यंत्रणांच्या कारवायांपासून संरक्षण मिळत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच पक्षांतरांचं प्रमाण वाढलं आहे.

शिंदे आणि फडणवीस सरकारमधील दलबदलू मंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील: अहमदनगरमधील विखे-पाटील हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचं कुटुंब. राधाकृष्ण विखे-पाटील आधी शिवसेनेत होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. अनेक मंत्रिपदं भूषवली. काँग्रेसचं सरकार गेल्यानंतर पक्षानं त्यांना विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद दिलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
टांगा पल्टी, मंत्रिपदं फरार, सांगली-साताऱ्याला विस्तारात संधी, कोल्हापूरच्या पदरी निराशा
दीपक केसरकर: शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या केसरकर यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. केसरकर आधी काँग्रेसमध्ये होते. मग ते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिंदेंच्या बंडानंतर त्यांना साथ दिली आणि कॅबिनेट मंत्री झाले.

उदय सामंत: २००४ पासून सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या सामंत यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादीतून केली. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम केला. हाती शिवबंधन बांधलं. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या सामंत यांनी शिंदे गटात उशिरा प्रवेश केला. मात्र त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
शेलारांचं नाव भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत, पण फडणवीसांच्या मनात वेगळीच जबाबदारी
अब्दुल सत्तार: मूळचे काँग्रेसी असलेल्या अब्दुल सत्तार यांनी राजकीय वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेत प्रवेश केला. सत्तारांना २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवायची होती. मात्र काँग्रेसनं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे सत्तार नाराज झाले. त्यांनी काँग्रेसचा हात सोडला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. त्यानंतर शिंदेंच्या बंडाला साथ देत आता कॅबिनेट मंत्री झाले.

तानाजी सावंत: सोलापूरच्या परांडा विधानसभेचे आमदार असलेले तानाजी सावंत आधी राष्ट्रवादीत होते. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेनं २०१६ मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. २०१९ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. शिंदे गटात गेल्यानंतर आता त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

विजयकुमार गावित: बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भाजप नेत्यांनी गावित यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रवादीचे नेते असलेले गावित त्यामुळे चांगलेच अडचणीत आले. २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीआधी गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गावित यांच्या कन्या हिना लोकसभेच्या खासदार आहेत. आता गावित यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here