इटलीमध्ये दरवर्षी महायुद्धात वापरण्यात आलेली ६० हजारांहून अधिक शस्त्रं आणि उपकरणं आढळून येतात. यामध्ये हातबॉम्ब, गोळ्या यांचा समावेश आहे. स्फोट न झालेल्या बॉम्बचा शोध घेऊन तो निकामी करणाऱ्या ३० कंपन्या इटलीमध्ये कार्यरत आहेत.
२०१४ मध्ये हाँगकाँगमध्ये १ टन वजनाचा बॉम्ब सापडला होता. हा बॉम्बदेखील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील होता. २०११ मध्ये जर्मनीच्या राईन नदीत एक बॉम्ब आढळून आला होता. २ टन वजनाचा बॉम्ब निकामी करण्यात आला. त्यासाठी ४५ हजार जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं होतं. हा बॉम्बचं नाव ब्लॉकबस्टर होतं. ब्रिटिननं या बॉम्बची निर्मिती केली होती. राईन नदीचं पाणी आटल्यानं हा बॉम्ब आढळून आला.
२०१९ मध्ये इटलीच्या ब्रिंडिसी शहरात एका चित्रपटगृहाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. त्यावेळी एक बॉम्ब सापडला. बॉम्बचा आकार खूप मोठा होता. शहरातील ५४ हजार जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. इटलीमध्ये शांतता काळात झालेलं हे सर्वात मोठं स्थलांतर होतं.