छत्रपती संभाजीराजे भोसले तुळजापूर संभाजीनगरकडे जात असताना बीड गेवराई शहरामध्ये बायपासजवळ शिवप्रेमींनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. छत्रपतींच्या स्वागतासाठी जमलेल्या तरुणांनी त्यांना फेटा घातला. यावेळी एक तरुण छत्रपतींच्या कपाळावर गुलाल लावण्यास गेला.

छत्रपतींचे स्वागत होत असताना एका तरुणाने त्यांच्या कपाळी गुलाल लावण्याचा प्रयत्न केला. मात्र संभाजीराजे भोसले यांनी त्याला नकार दिला. संभाजीराजे छत्रपतींनी गुलाल लावण्यास नकार का दिला, असा प्रश्न तिथेत उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच पडला. इतर वेळेस राजे कुंकू टिळा लावतात. मात्र गुलाल या पावडरची राजेंना ऍलर्जी आहे. त्यामुळे ते गुलाल लावणे टाळतात.
कपाळावर गुलाल लावल्यास संभाजीराजेंना त्याचा त्रास होतो. पावडरमुळे रिऍक्शन होत असल्याने राजेंनी गुलाल लावून घेणे टाळले. ही बाब अनेकांना माहीत नसल्याने राजेंनी कपाळी गुलाल न लावून घेतल्याची चर्चा बीड शहरात सुरू झाली. व्हिडीओदेखील व्हायरल झाला. मात्र जवळच्याच कार्यकर्त्यांनी हा खुलासा केल्यानंतर याविषयीचा संभ्रम हा मिटला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.