Abdul Sattar Cabinet Expansion | आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर मंत्रिमंडळाच्या तोंडावर टीईटी परीक्षा घोटाळ्याशी संबंधित आरोप झाल्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी सत्तार यांना क्लीनचीट दिली. त्यामुळे सत्तार रात्री तीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांना शिक्षण विभागाचे क्लीन चीट दिल्याचे पत्र घेऊन भेटले आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवल्याचे समजते.

हायलाइट्स:
- शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
- ठाण्यातील नंदनवन या बंगल्यावर रात्री ३ वाजता
- ही बैठक सकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरु होती
एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशी सुरुवातीला हिंगोली आणि नंतर नांदेडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळात वर्णी लागू न शकलेले नाराज त्यांच्याशी संपर्क साधू शकणार नाहीत, असा अंदाज होता. एकनाथ शिंदे हे मंगळवारी पहाटे तीन वाजता नंदनवन बंगल्यावर परतले. यानंतर अब्दुल सत्तार भल्या पहाटे शिंदे यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे आणखी काही आमदारही याठिकाणी होते. त्यानंतर ही बैठक सकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरु होती. तेव्हाच अब्दुल सत्तार यांनी एक पत्र दाखवून संपूर्ण डाव पलटल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश करावाच लागला.
नेमकं काय घडलं?
आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर मंत्रिमंडळाच्या तोंडावर टीईटी परीक्षा घोटाळ्याशी संबंधित आरोप झाल्यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. मात्र, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी सत्तार यांना क्लीनचीट दिली. त्यामुळे सत्तार रात्री तीन वाजता मुख्यमंत्री शिंदे यांना शिक्षण विभागाचे क्लीन चीट दिल्याचे पत्र घेऊन भेटले आणि त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळवल्याचे समजते. दरम्यान, सत्तार यांच्या मंत्रीमंडळातील समावेशावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. सरकारमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मानाचे स्थान, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. सरकारमध्ये अन्य काही आमदार इच्छुक असताना, तसेच अपक्ष आणि छोट्या पक्षांऐवजी सत्तार यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
संजय राठोडांचंही शेवटपर्यंत लॉबिंग, प्रयत्न फळाला आले
अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणे आमदार संजय राठोड यांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेले लॉबिंग त्यांच्या कामी आल्याचे दिसले. त्यामुळे गंभीर आरोप असूनही संजय राठोड यांना क्लीन चीट आणि मंत्रीपद दोन्हीही मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नांदेड दौऱ्यावर गेले होते. त्यावेळीही संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी संजय राठोड हे आपल्या पत्नीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर गेले होते.त्यानंतर साडेनऊ वाजता राठोड हे सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीलाही पोहोचले. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या या कष्टाचे अखेर चीज झाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.