परभणी : शेतामध्ये कापसाच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डब्याचे झाकण उघडताना १९ वर्षीय तरुणाच्या पोटात कीटकनाशक गेले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील सोन्ना शिवारात घडली. योगेश गणेश मगर असं मृत तरुण शेतकऱ्याचं नाव आहे.

सेलू सोन्ना येथील योगेश मगर हा शेतातील कापूस पिकावर फवारणी करण्यासाठी गेला होता. यावेळी कीटकनाशकाच्या डब्याचे झाकण उघडत असताना योगेशच्या तोंडामध्ये औषधे गेले. त्यामुळे काही वेळाने योगेशला मळमळ, उलटी आणि चक्कर असा त्रास सुरू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी योगेशला सेलू शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

बिहारच्या राजकीय भूकंपाचे खरे कारण…;१२ वर्ष नितीश कुमार एकच गोष्ट मागत होते, मोदी सरकारने भाव दिला नाही

तरुण वयामध्ये योगेश असा अचानक निघून गेल्याने मगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी योगेश याचे चुलते गोविंद मगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ठाणे ग्रामीणमध्ये शिवसेनेला आणखी एक धक्का; जिल्हाप्रमुखाने केली मोठी घोषणा

दरम्यान, शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी खबरदारी बाळगावी, असा सल्ला वारंवार कृषी विभागाकडून दिला जातो. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा घटना घडत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here