औरंगाबाद : फूड इंजिनियरसोबत प्रेम जुळले घरच्यांचा विरोध डावलून २४ वर्षीय डॉक्टर तरुणीने औरंगाबादच्या तरुणासोबत आंतरजातीय विवाह केला. मात्र, लग्नाच्या पाच महिन्यातच पती दारू पिऊन बेदम मारहाण करायला लागला. सासू-सासरे नातलगासमोर अपमान करून सतत फरकतीची मागणी करू लागला. या सगळ्याला कंटाळून तरुणीने असं काही केलं की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने इन्सुलिनचे ओव्हर डोस घेत जीवन संपविले. ही धक्कादायक माहिती अढळलेल्या सुसाईड नोटमधून समोर आली आहे. वर्षा अंबादास व्यवहारे (२४, मूळ रा. बीड) असे मृत डॉक्टर तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पती धनंजय वसंत डोंगरे (२५, रा. सावरगाव पोखरी, ता. गेवराई) याच्यासह सासू-सासऱ्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पुण्यात भर दिवसा ७ वर्षीय मुलीचे अपहरण आणि लैंगिक अत्याचार, वडिलांना डबा देऊन परतताना घडलं भयंकर
तीन पानी लिहलेल्या पत्रात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात ‘माझ्या मृत्यूला सर्वस्वी पती, सासू व सासरकडील मंडळी जबाबदार आहे. तीन वर्षांपासून आमचे प्रेमसबंध होते. त्याने प्रेमात फसवून माझा गैरफायदा घेतला. कायम पैसे घेऊन मारहाण करत होता. अचानक मला दुसरे लग्न करायचे, फारकत दे, अशी मागणी करू लागला. सासू, सासरे कायम जातीवरून, दिसण्यावरून टोमणे मारत. एका नातेवाईकाने तर बलात्कार करण्याची धमकी दिली’ असे तिने पत्रात नमूद केले आहे.

तसेच एका पानावर बँक खात्याची माहिती, पासवर्ड लिहिला. तिने ८५ हजारांची एफडी केली होती. हे पैसे आई-वडिलांना देण्यास सांगितले. मोबाइल पासवर्ड लिहिला. ‘मी बीडची आहे. पीएसआय पल्लवी जाधव मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही मला न्याय द्या. मम्मी-पप्पा मला माफ करा, माझं त्याच्यावर प्रेम होतं. पण तुमच्यापेक्षा जास्त नव्हतं. तो मला फसवत गेला आणि मी फसत गेले. आता सुद्धा माझी मरायची इच्छा नाही. पण मी जे काही केले त्यामुळे तुम्हाला त्रास झाला. आता मला एकटीला समाजाला सामोरे जायला त्रास होईल. हे सगळे नाईलाजाने झालेले आहे. मला माफ करा मम्मी-पप्पा. प्लीज’ असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीने पत्रात लिहिले आहे.

फिल्मी स्टाईलने जावयाची हत्या, दुचाकीला मृतदेह बांधून नदीत फेकला; १५ दिवसांनी पाहा काय झालं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here