Mumbai Best Bus Accident : मुंबई शहरातील शहरातील बेस्टच्या बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाहीये. मात्र, काहीजण जखमी झाले आहेत.

 

VIDEO : थरारक अपघात! ब्रेक अचानक फेल; ७ गाड्या चिरडल्या, दोघे जखमी
VIDEO : थरारक अपघात! ब्रेक अचानक फेल; ७ गाड्या चिरडल्या, दोघे जखमी

हायलाइट्स:

  • मुंबईत बेस्ट बसचा भीषण अपघात
  • अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा
  • सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही
मुंबई : शहरातील बेस्टच्या बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र, काहीजण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबईत बेस्ट बसच्या अपघातांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यात अशी घटना घडल्यामुळे सर्वच विचलित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक किसन धोंगडे हे ३२६ क्रमाकांची बस चालवत होते. ही बस शिवशाही प्रकल्प, दिंडोशी वरून कुर्ल्याकडे जात होती. त्यावेळी साधारण साडे तीन वाजेच्या सुमारास संतोष नगर बीएमसी कॉलनी, डी वार्ड समोरील मंदिराला बसने धडक दिली. बसने केवळ धडकच दिली नाही तर बस समोरील जेवढ्या रिक्षा होत्या त्या सर्व रिक्षाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात बस चालक आणि वाहक दोघेही जखमी झाले असून काही बस प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेदांत खासगी रूग्णालय, दिंडोशी येथे उपचार सुरू आहेत.

तेलही गेले अन् तूपही गेले? बंडखोरी केलेल्या बच्चू कडूंची अडचण; आता प्रतीक्षा विस्ताराची
प्राथमिक माहितीनुसार, जखमीवर नजीकच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, अपघात झाला त्यावेळी बसमध्ये प्रवासीही होते. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. प्राथमिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे कळत आहे. परिस्थिती गंभीर असतानाही चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.

नितीश कुमार यांनी अचानक भाजपला का सोडले; प्रशांत किशोर यांचा हात होता? स्वत: दिले उत्तर

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here