अहमदनगर : जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची गाय तब्बल २ लाख ११ हजार रुपयांना ( Hybrid Cow Breeds ) विकली गेली. गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात ‘गुड्डी’ नावाच्या या गायीची पाठवणी करण्यात आली. गाय विक्रीची ही विक्रमी किंमत असून ही गाय दररोज ४० लिटर दूध देते.

विविध कारणांनी शेती करणे जिकरीचे झाले असले तरी शेतीला पूरक जोडधंदा केला तर आर्थिक प्रगती साधता येते. याचेच उत्तम उदाहरण अहमदनगर जिल्ह्यात बघायला मिळाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रशांत, अमोल व राजेंद्र नागले या शेतकरी बंधूंनी काही वर्षांपूर्वी शेती पूरक दुग्ध व्यवसाय सुरू केला. मात्र आता नागले बंधुंचा हा मुख्य व्यवसाय झाला आहे.

गोपालन व्यवसायात सातत्याने वाढ करून त्याचे मुख्य व्यवसायात रुपांतर केल्याने नागले यांच्या गोठ्यात दर्जेदार अशा ५० पेक्षा अधिक संकरीत गाई आहेत. नागले बंधूंनी स्वतःच्या शेतातच सुमारे दीड एक जागेत मुक्त गोठा सुरू केलेला आहे. या गोठ्यात दर्जेदार वानाच्या गाईंचे संगोपन केले जात असून दररोज सुमारे ४५० ते ५०० लिटर दूध वितरीत केले जाते.

hybrid cow breeds shrirampur

ढोल ताशांच्या गजरात ‘गुड्डी’ नावाच्या या गायीची पाठवणी

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी… संकरित गायीच्या पोटी जन्मली देशी कालवड

नागले बंधूंच्या गोठ्यातील ‘गुड्डी’ नावाच्या संकरीत गाईची गोठ्यातच विक्रि झाली. तब्बल २ लाख ११ हजार १ रुपयांना ही गाय राहाता तालुक्यातील सोनगाव येथील गायींचे व्यापारी नूर शेख यांनी खरेदी केली. आतापर्यंतच्या खरेदी-विक्रितील ही उच्चांकी किंमत आसल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या विताची ही गाय दररोज सुमारे ४० लिटर दूध देते. या आगोदार नागले बंधूंच्या गोठ्यातील दररोज ३५ लिटर दूध देणाऱ्या ‘राणी’ नावाच्या गायीला १ लाख ४१ हजार रुपये तर ‘लक्ष्मी’ नावाच्या ३० लिटर दूध देणाऱ्या गायीला १ लाख २१ हजार रुपये विक्री किंमत मिळाली होती. विक्रिनंतर ‘गुड्डी’ या गायीची बस स्थानक परीसरातून भर पावसातही गुलालाची उधळण करीत व ढोल ताशाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर नागले बंधूंनी या गायीची पाठवणी केली. यावेळी टाकळीभान ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमेरिकेसारखे रस्ते राहू द्या, नगर-मनमाडचा ठेकेदार कुठे पळवून लावला? थेट गडकरींना रोकडा सवाल

hybrid cow breeds shrirampur

गाय तब्बल २ लाख ११ हजार रुपयांना विकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here