Devendra Fadnavis vs Sharad Pawar | शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

Sharad Pawar Devendra Fadnavis
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • बिहारमध्ये भाजपचे ७५ लोक निवडून आले होते
  • संयुक्त जनता दलाचे (JDU) ४२ आमदार निवडून आले होते
  • तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले
मुंबई: भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये मित्रपक्षांना सातत्याने संपवण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस ( यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बिहारमध्ये भाजपचे ७५ लोक निवडून आले होते. तर संयुक्त जनता दलाचे (JDU) ४२ आमदार निवडून आले होते. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबत होती. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. आता शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Cabinet Portfolios: युद्धात जिंकलं पण तहात गमावलं! मलाईदार खाती भाजपला, शिंदे गटाच्या आमदारांना जुनीच खाती?
शरद पवारांच्यावेळी पक्षांतरबंदी कायदा अस्तित्त्वात नव्हता: फडणवीस

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना पक्षावर करण्यात येणार दावा, अयोग्य असल्याचे म्हटले होते. मी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा मी वेगळे चिन्ह घेऊन लढलो, याची आठवण पवार यांनी सांगितली. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी म्हटले की, शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्त्वात नव्हता. आज तो कायदा अस्तित्त्वात आहे. आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तेलही गेले अन् तूपही गेले? बंडखोरी केलेल्या बच्चू कडूंची अडचण; आता प्रतीक्षा विस्ताराची
शरद पवार नेमकं काय म्हणाले?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी भविष्यात प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले होते. देशात फक्त भाजप हाच पक्ष राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. नितीश कुमार यांची हीच तक्रार आहे. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते. त्याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष आज जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेकवर्षे एकत्र होते. आज भाजपने शिवसेनेची अवस्था काय केली आहे? भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here