Kedar Dighe shivsena, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना मुंबई सेशन्स कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर – mumbai sessions court granted pre-arrest bail to shiv sena’s thane district chief kedar dighe in rape case
मुंबई : कथित बलात्कार प्रकरणात आरोपीला मदत केल्याचा आरोप असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना मुंबई सेशन्स कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने जामीन मंजूर करत अटकेपासून संरक्षण दिल्याने केदार दिघे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोअर परळ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ३० ते ३२ वर्षाची एक तरुणी सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करत होती. हॉटेलची मेंबरशिप घेण्यासाठी केदार दिघे यांचा मित्र रोहित कपूर त्या हॉटेलमध्ये गेला. सदस्य फीचा चेक घेण्यासाठी हॉटेलच्या खोलीत गेल्यावर रोहितने बलात्कार केल्याचा आरोप सदर तरूणीकडून करण्यात आला आहे. तसंच याबाबत पोलिसांत तक्रार न करण्यासाठी केदार दिघे यांच्याकडून धमक्या येत होत्या, असंही पीडित तरूणीने तक्रारीत म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांकडून केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, राजकीय आकसातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केदार दिघे यांच्या समर्थकांनी केला होता.