जळगाव : नशिराबाद गावाजवळील कडगाव फाट्याजवळ भादली येथील तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. संदेश लिलाधर आढाळे (वय-२२) रा. डोंगरकठोरा. ता. यावल ह.मु. भादली ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश लिलाधर आढाळे हा तरूण आई-वडीलांसह भादली इथे वास्तव्याला होता. जळगावात एका खासगी फायनान्स कंपनीत तो कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक इथे राहतात. संदेश हा रात्री घराबाहेर पडला पण परत घरी आला नाही.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने वाहतूक रोखली; मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात जाणारे महत्त्वाचे मार्ग बंद
शेतकऱ्यांना बुधवारी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला. घटनेची माहिती बदली येथील पोलीस पाटील डॉ. राधिका ढाके यांनी नशिराबाद पोलिसांना दिली. त्यानुसार, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संदेश याच्या पोटावर आणि डोक्यावर वार केल्याच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस उपाधीक्षक कुमार चिंता यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली. शेवटचे वृत्त आत्या आले तोपर्यंत घटनेचा पंचनामा करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

डॉक्टर तरुणीची इन्सुलिनचे ओव्हरडोस घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here