आई अंगणवाडी सेविका
अंगणवाडी सेविका असलेल्या बिंदू आणि त्यांचा मुलगा विवेक जो २४ वर्षाचा आहे. या दोघंही एकाच वेळी केरळ पीएससीची एलडीसीची परीक्षा पास झाले आहेत. ज्यावेळी बिंदूचा मुलगा दहावीत होता. त्यावेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मुलाला त्या प्रेरणा देत होत्या. मात्र, आता ९ वर्षानंतर आई आणि मुलगा एकाचवेळी सरकारी नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसले आणि पासही झाले आहेत.
गेल्या १० वर्षापासून बिंदू या अगणवाडीच्या केंद्रात काम करतात. दोघंही परीक्षेत पास झाले असले तरी विवेक सांगतो की, आम्ही दोघांनी कधीच एकत्र अभ्यास केला नाही. मात्र, अभ्यासाबाबत आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करत राहिलो. विवेक म्हणतो मला एकांतात आणि एकटाच अभ्यास करायसा आवडते, तर आईला कधी तरी वेळ मिळायचा, अंगणवाडी, घरातील काम करून वेळ मिळेल तेव्हा ती अभ्यास करायची. मात्र, अभ्यासातील सातत्य तिने कधी कमी पडू दिलं नाही.
राज्यात मायलेकरांचीच चर्चा
आई आणि मुलाच्या यशामुळे बिंदू आणि त्यांचा मुलगा विवेक केरळमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत. बिंदू स्वत: सांगतात की, सरकारी नोकरीसाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वत: आहे. ही परीक्षा आहे म्हणून मी चोवीस तास अभ्यासच करत बसले नाही तर त्या अभ्यासात सातत्य ठेवले. मात्र, परीक्षेला सहा महिने असताना परीक्षेची जय्यत तयारी केली, असंही त्या सांगतात.
बिंदू आता सांगतात की, आपण आता कनिष्ठ वर्गातील लिपीक पदासाठी मी काम करणार तर माझा मुलगाही लिपीक म्हणूनच आपल्या नोकरीची सुरूवात करेल. केरळ स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिंदू यांना ९२वा क्रमांक मिळाला आहे. तर त्यांचा मुलगा विवेकला ३८वा क्रमांक मिळाला आहे.