बॉलिवूडमधील स्टारकिड्स सध्या चर्चेत आहे. पण सर्वात छोटा स्टारकिड्स नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतात. तो म्हणजे करिना आणि सैफ यांचा मुलगा तैमूर अली खान. तैमूरचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी तो पापराझीला मजेशीर पोज देताना दिसतो तर कधी तो माझे फोटो नका काढू असंही सांगतो. पापराझीमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे.
तैमूरची क्रेझ पाहता करिना आणि सैफनं त्याला विदेशात पाठवण्याचाही निर्णय घेतला होता, असं म्हटलं जातं. आता करिनानंच स्वत: तैमूरबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ‘तैमूरला फोटो काढायला आवडत नाही. तो मला नेहमी म्हणतो की तू आणि अब्बा खूपच फेमस आहात. पण त्यांना माझा फोटो का काढायचा आहे. मी तर फेमस नाही. यावर मी देखील त्याला हेच समजावते की, तू काही सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्ती नाहीस. पण मग तो पुन्हा तो हाच प्रश्न विचारतो, की, हे फोटोग्राफर्स माझेही फोटो का काढतात..आणि मग तो खूप चिडतो’, हा किस्सा नुकताच करिनानं एका मुलाखतीत शेअर केलाय.
‘फाॅरेस्ट गम्प’ची हिंदी आवृत्ती
लाल सिंग चड्ढा अधिकृतरित्या फाॅरेस्ट गम्प या प्रसिद्ध हाॅलिवूडपटाची आवृत्ती आहे. त्या सिनेमात टाॅम हँक्सनं काम केलं होतं. लाल सिंग चड्ढा चित्रपटात आमिर खानसोबत करिना कपूर, मोना सिंह आणि नागा चैतन्य महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.