हनगळच्या वासना गावातील मलेशप्पा हलगज्जनावरा यांनी ४ वर्षांपूर्वी हा ‘ब्रह्मा’ बैल १ लाख २५ हजारात विकत घेतला होता. तेव्हापासून हा बैल चर्चेत आहे. हावेरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील विविध स्पर्धांमध्ये या बैलाने अनेकदा बाजी मारली आहे. आठ वर्षांच्या या बैलाची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे या बैलाचे अनेक चाहतेही आहेत. Kobri Hori म्हणजे बैल पकडण्याच्या खेळासाठी प्रशिक्षित केल्यानंतर या बैलाने २५० मीटर अंतर हे फक्त ८ ते ९ सेकंदात पार केलं, असा दावा मल्लेशप्पा यांनी केला. या बैलाला स्पर्धेत अद्याप कोणीही पकडू शकलेले नाही. हा कर्नाटकातील या स्पर्धेचा सरताज आहे. अशी या बैलाची ओळख आहे.

ब्रह्मासाठी मोजले १९ लाख; तामिळनाडूच्या शेतकऱ्याची चर्चा देशभरात
तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील काटपडी येथील असलेल्या नवीन यांनी या बैलासाठी ६ लाख रुपये अॅडव्हान्समध्ये दिले होते. अमृत महल आणि हल्लीकर जातींच्या मिश्रणातून जन्माला आलेला हा बैल आहे. या बैलाच्या कामगिरीवर नवीन यांचे आधीपासूनच बारकाईने लक्ष होते. त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर ते मल्लेशप्पा यांच्याकडे आणि नवीन यांनी त्यांना मोठी ऑफर दिली. तामिळनाडूतील जल्लीकट्टूमध्ये ‘ब्रह्मा’ला उतरवण्याचा त्यांचा इरादा आहे.
SHIV SENA : आम्ही शिवसेना फोडली, नितीशकुमारांवर टीका करत भाजप नेत्याने दिली कबुली
‘ब्रह्मा’चा विक्रीने कर्नाटकातील त्याचे चाहते निराश झाले आहेत. बैलाचा सौदा रद्द करावा यासाठी अनेकांनी मल्लेशप्पाची मनधरणी सुरू केली आहे. कारण ‘कोब्री होरी’ हा खेळ ‘ब्रह्मा’शिवाय घेण्याचा विचारही त्यांना सहन होत नाहीए.
Varavara Rao : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरवरा राव यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर