अमरावती : पांढुर्णा अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून कत्तलीसाठी गायींची अवैधरित्या अत्यंत निर्दयतेने वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती शेंदुरजनाघाट पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठून १ कालवड व ५ गायींना जीवनदान देऊन ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांढुर्णा-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पुसला गावापासून काही अंतरावरच असलेल्या आरटीओ चेकपोस्ट येथून फोनद्वारे माहिती मिळाली की, चेकपोस्टजवळ एक सिल्वर रंगाची तवेरा उभी असून, त्यामध्ये गायी कोंबून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. या माहितीवरून शेंदुरजनाघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पाहणी केली.

डॉक्टर तरुणीची इन्सुलिनचे ओव्हरडोस घेत आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
यावेळी सिल्वर रंगाची चारचाकी तवेरा गाडी क्र. एमएच ०४ई. एस८८९६ या वाहनामध्ये ५ गायीव १ कालवड (गाय) असे एकूण ६ गायी कोंबून भरल्या दिसल्या. गायींच्या पायांना निर्दयतेने दोऱ्या बांधून चारा पाण्याची व्यवस्था न करता तवेरा वाहनात गायींना कोंबून निर्दयतेने वाहतूक करीत कत्तलीसाठी नेतांना आढळून आले. यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून १ कालवड (गाय) व ५ गायी, असे एकूण ६ गायीकिंमत ५५ हजार रूपये आणि सिल्वर रंगाचे तवेरा वाहनक्र. एम.एच ०४ ई.एस ८८९६ किंमत ३ लाख रुपये असा एकूण ३ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यात घेतला.

तसेच सर्व गायींची पशु वैद्यकीय अधिकारी मलकापुर शेंदुरजनाघाट यांना पत्र देऊन तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व गायींना गोपाल कृष्ण गौरक्षण संस्था वरूड येथे सुरक्षीतेसाठी पाण्याच्या व्यवस्थेसाठी ठेवण्यात आले आहे. तवेरागाडी पोलीस स्टेशनमध्ये आणून जप्त करण्यात आली. यातील फरार आरोपीविरूध्द पोलिसांनी कलम ११ (१), (ड), (ई), प्रांण्याना निर्दयतेने वागवण्याचा प्रतिबंधक कायदा १९६०, सहकलम ५ (अ), (१), ९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ कलम ११९ महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम ४२९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाने वाहतूक रोखली; मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात जाणारे महत्त्वाचे मार्ग बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here