nashik latest news : नाशकातील सिडको परिसरातील पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमधून पहिल्या मजल्यावरून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

nashik latest news
नाशिक हळहळलं! पहिल्या मजल्यावरून तोल गेला, १८ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

हायलाइट्स:

  • पहिल्या मजल्यावरून पडून १८ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू
  • बाल्कनीत खेळत असताना चिमुकलीचा मृत्यू
  • नाशकातील पवन नगर ज्योती अपार्टमेंट मधील घटना
नाशिक : सिडको परिसरातील पवन नगर येथील ज्योती अपार्टमेंटमधून पहिल्या मजल्यावरून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे आईवडिलांवर मोठा आघात झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशकातील पवन नगर ज्योती अपार्टमेंटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या राहूल खैरनार यांची १८ महिन्याची मुलगी समृद्धी ही घरात खेळत होती. खेळता खेळता ती बाल्कनीत गेली व तिचा तोल गेल्याने ती खाली पडली खाली पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली व या घटनेत समृद्धीचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या घटनेने खैरनार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून समृद्धीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चारचौघात मारहाण, जीवेमारण्याची धमकी, चौघांना सोबत घेतलं अन् धमकी देणाऱ्यालाच संपवलं
दरम्यान, घटना घडली तेव्हा चिमुकलीचे आई-वडील घटनास्थळी नसल्याते सांगण्यात येत आहे. यावेळी तिचे आईवडील घटनास्थळी नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे ती पडल्यानंतर लगेच तिला उपचार केले असते तर वाचली असती अशीही चर्चा सुरू होती. समृद्धीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे खैरनार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. १८ महिन्यांच्या समृद्धीच्या मृत्यूने लहान मुलांना एकटे बाल्कनीत सोडल्याने एका निष्पाम जिवाला मुकावे लागल्याने शेजाऱ्यांचेही मन हेलावले असल्याचे सांगितले. लहान मुलांना एकटे सोडल्याने त्यांच्या जीवावर बेतू शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय; काय आहे गोल्ड ETF, जाणून घ्या त्याचे फायदे, किती खरेदी करावे

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here