90 year old woman wins court battle son and wife must leave it: घरगुती हिंसाचाराविरोधात न्यायालयाचं दार ठोठावणाऱ्या ९० वर्षांच्या महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुलगा आणि सून त्रास देत असल्यानं ९० वर्षीय महिला सत्र न्यायालयात गेली. न्यायाधीशांनी महिलेच्या बाजूनं निकाल दिला.

घरात ५० टक्के वाटा असूनही आपल्याला मुली आणि जावयाकडे राहण्यास भाग पाडलं जात असल्याचा दावा महिलेनं केला होता. महिला असल्यानं आपल्याला घरातून बाहेर काढता येणार नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्ता असलेल्या महिलेच्या सुनेच्या वतीनं करण्यात आला. त्यावर घरगुती हिंसाचाराच्या कायद्याच्या अंतर्गत महिलेला समान वाटा असलेल्या घरात पूर्णत: अनुचित असलेले अधिकार देऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयानं सुनावलं.
सुनेसाठी घराची सोय करण्याची जबाबदारी तिच्या पतीची असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. याचिकाकर्ता महिलेनं घरगुती हिंसाचाराविरोधात दंडाधिकाऱ्यांकडे २०११ मध्ये तक्रार दाखल केली. २०१० मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं. पतीनं त्यांना घरात ५० टक्के वाटा दिला. पतीच्या निधनानंतर मुलाचं आणि सुनेची वर्तणूक बदलली. त्यांनी याचिकाकर्त्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. महिलेला घरातील तिचा वाटा होता. त्यामुळे मुलानं आणि सुनेनं महिलेचा छळ सुरू केला. दोघेही शारीरिक हिंसाचार करत असल्यानं महिलेनं गेल्या ११ वर्षांत मुलगा आणि सुनेविरोधात चार पोलीस तक्रारी दाखल केल्या.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.