मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य अवलंबून असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील १२ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी लांबणीवर गेल्याची माहिती मिळाली आहे. शिवसेनेकडून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या याचिकांवर महत्त्वाची सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र, आता पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. सरन्यायाधीश २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असल्याने त्यापूर्वीच या याचिकांचा निकाल लागणार की त्या घटनापीठाकडे सोपवल्या जाणार हे पुढील सुनावणीवेळी निश्चित होऊ शकतं

एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हरीश साळवेंनी केलेला युक्तिवाद

‘शिवसेना पक्षात विभाजन झालेले नसून, पक्षाच्या नेतृत्वाविषयी वाद आहे. तो पक्षांतर्गत असून, तो पक्षांतरबंदीच्या कक्षेत येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाखूष असलेल्या पक्षाच्या बहुसंख्य आमदारांना नेतृत्वबदल हवा असल्यास तो पक्षांतर्गत विरोध ठरतो,’ असा युक्तिवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता.

लाडक्या पुतणीला अखेरचा निरोप, डबडबलेल्या डोळ्यांनीच दादा भुसे शपथ घ्यायला आले…
शिवसेनेचा युक्तिवाद

‘शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुख्य प्रतोदांनी काढलेल्या पक्षादेशाचे उल्लंघन केले असून, घटनेतील दहाव्या अनुसूचीतील दुसऱ्या परिच्छेदातील १ (ब)च्या आधारे त्यांना अपात्र ठरविण्यात यावे,’ असे उद्धव गटातर्फे कपिल सिब्बल म्हणाले होते. ‘व्हिप किंवा पक्षादेश ही राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षादरम्यानची नाळ आहे. केवळ विधिमंडळ पक्षात बहुमताचा दावा केल्याने ती तुटत नाही. बंडखोर आमदारांचा गट कोणत्याही पक्षात विलीन झालेला नसल्यामुळे दहाव्या अनुसूचीच्या चौथ्या परिच्छेदानुसार त्यांना कोणतेही संरक्षण नाही. या आमदारांना शिवसेनेच्या बैठकीसाठी बोलविले असतानाही ते आधी सुरतला आणि तेथून गुवाहाटीला गेले. त्यांनी उपाध्यक्षांना पत्र लिहून आपला प्रतोद नियुक्त केला. असे आचरण करून त्यांनी शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

गावात रस्ताच नाही, प्रसूतीसाठी बैलगाडीतून रुग्णालय गाठलं, महिला म्हणाल्या – मुख्यमंत्री साहेब इकडेही लक्ष द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here