Pune News Today : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दि. ९, १०, ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हायलाइट्स:
- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
- प्रदर्शनात बाराशेहून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे
या प्रसंगी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त अॅड. नंदिनी शहासने तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. मोहन शेटे, साहित्यिक प्रा.शाम भुर्के, प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे व उद्योजक संतोष मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पर्यावरणप्रेमी स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचा गौरव करून सांगितले की ही क्रांतिकारकांची दूर्मिळ छायाचित्रे गावोगावी प्रदर्शित होणे, राष्ट्रभक्तीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचणे, हा इतिहासाचा वारसा जपणे हे आपले कर्तव्य आहे. पुणे मनपाचे अति. महायुक्त मा. विलास कानडे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रभक्तीचा संदेश पुणे महानगरपालिकेत जास्तीत जास्त ठिकाणी पोचवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यसेनानी वसंत प्रसादे व डॉ. तांबट यांनी सांगितलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील जिवंत घटना ऐकून श्रोते भारावले. डॉ. तांबट यांनी त्यांनी आणि त्यांच्या आईने सहभाग घेतलेल्या एका लढ्यातील प्रसंगाचे चित्र प्रदर्शनात पाहून त्यामागची गोष्टही त्यांनी उपस्थितांना सांगितली. प्रदर्शनातील एक छायाचित्र कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या संग्रहातील हा हजारो क्रांतिकारकांच्या छायाचित्राचा ठेवा प्रदर्शनरूपाने डोणजे या गावी कायमस्वरूपी जतन करण्याचे ईश्वरी दिशा आरोग्य संघाचे श्री. संतोष पांढरे यांनी सांगितले. दिव्यम्स इंडियन चेंबर्सच्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी हा ‘क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचा ठेवा’ शाळा व महाविद्यालयातून प्रदर्शित करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले .
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.