मुंबई : “संजय राठोड हा पुण्याच्या तरुणीचा हत्यारा आहे. काल त्याचा मंत्रिमंडळातील समावेश हा दुर्दैवी आहे. त्याच्याविरोधातील माझा लढा सुरुच राहील”, अशी संतप्त प्रतिक्रिया देत नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांच्याविरोधातील संघर्षाचा दुसरा अंक भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुरु केला. शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या. त्यांनी राठोडांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर आगपाखड केली. आज त्याच चित्रा वाघ यांना उत्तर देताना संजय राठोड यांनी मंत्रिपदाची ‘पॉवर’ मिळताच रोखठोक इशारा दिला.

“माझ्यावर आरोप झाल्यानंतर कोणत्याही दबावाशिवाय चौकशी व्हावी, यासाठी मी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा दिला. चौकशीअंती पोलिसांनी मला क्लिनचिट दिली. मी खरोखर निष्कलंक आहे. त्यानंतरच मला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. अशा प्रकरणात किती त्रास होतो, हे तुम्हाला कळणार नाही. माझी विनंती आहे पोलिसांच्या क्लीनचिटनंतर तरी आरोप थांबले पाहिजेत. पण जर आरोप असेच सुरु राहिले, असंच वातावरण सुरु राहिलं, मी कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे. कायदेशीर नोटीस सुद्धा देणार आहे”, असा इशारा राठोड यांनी चित्रा वाघ यांना दिला.

चित्रा वाघ यांच्या टीकेवर बोलताना संजय राठोड म्हणाले, “लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. तसा चित्रा वाघ यांनाही बोलण्याचा अधिकार आहे. कदाचित चित्राताईंना माहिती नसेल, पण पोलिसांच्या चौकशीची सगळी कागदपत्रं मी त्यांना पाठवून देण्याची व्यवस्था करतो”

संजय राठोड तिकडे शपथ घेत होते, इकडे चित्रा वाघ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती…!
“न्याय व्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास होता. म्हणून मी आतापर्यंत शांत होतो. मी दरम्यानच्या १५ महिन्यात नको ते भोगलेलं आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, माझाही परिवार आहे, मलाही मुलंबाळ आहेत, माझेही कार्यकर्ते आहेत. मी चार वेळा निवडून आलोय. मी जर तसं असतं तर जनतेने मला निवडून दिलं नसतं”, अशा प्रकरणात किती त्रास होतो, हे तुम्हाला कळणार नाही. माझी विनंती आहे पोलिसांच्या क्लीनचिटनंतर तरी आरोप थांबले पाहिजेत. पण जर आरोप असेच सुरु राहिले, असंच वातावरण सुरु राहिलं, मी कायदेशीर मार्ग अवलंबणार आहे. कायदेशीर नोटीस सुद्धा देणार आहे”, असं राठोड म्हणाले.

“माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी पिटिशन दाखल झाली होती. मात्र पुणे कोर्टाने हे पिटिशन फेटाळून लावले. कोणतंही एफआयआर नाही. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नाही”, असंही सांगायला राठोड विसरले नाहीत.

राठोडांना मंत्रिपद मिळाल्यावर चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या?

संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच चित्रा वाघ यांनी साधला निशाणा

ज्या संजय राठोडांविरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रान उठवलं, त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यासाठी अर्धा डझन पत्रकार परिषदा घेतल्या, त्यांची चौकशी करणाऱ्यांना पोलिसांना धारेवार धरलं, प्रसंगी त्यांच्यावरही आरोप केले. काल त्याच संजय राठोडांना एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राठोडांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. चित्रा वाघ यांनीही आक्रमक बाणा दाखवत संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाला तरी त्याच्याविरोधातला माझा लढा सुरुच राहणार असल्याचं सांगत त्यांच्याविरोधातला संघर्ष थांबणार नसल्याचा इरादा व्यक्त केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here