मंदिरातील दानपेटी चोरी करण्यासाठी चोर पोहोचला. मंदिरात गेल्यावर त्यानं देवीसमोर हात जोडून माफी मागितली. त्यानंतर त्यानं दानपेटी लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे.

 

jabalpur temple theft
जबलपूरमधील मंदिरात चोरी
जबलपूर: तुम्ही चोरांचे अनेक कारनामे ऐकले असतील. पण कधी संस्कारी चोराबद्दल ऐकलंय का? मंदिरात जाऊन चोरी करण्याआधी देवीची माफी मागणारा चोर तुम्ही कधी पाहिलाय का? मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये असा चोर आणि त्याची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मंदिरातील दानपेटी चोरी करण्यासाठी चोर पोहोचला. मंदिरात गेल्यावर त्यानं देवीसमोर हात जोडून माफी मागितली. त्यानंतर त्यानं दानपेटी लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. जबलपूरच्या माढोताल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सूखा गावात लक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराचं कुलूप फोडून एक चोर आत शिरला.
आता १ लाख घ्या, ५ नंतर देतो! विम्याच्या ३५ लाखांसाठी पतीनं पत्नीची सुपारी दिली अन् मग…
मंदिरात शिरल्यानंतर चोर देवीच्या मूर्तीसमोर पोहोचला. त्यानं देवीला पाहून दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. हात जोडून तो काही वेळ देवीसमोर उभा राहिला. त्यानंतर त्यानं शेजारीच असलेली दानपेटी काळजीपूर्वक उचलली आणि तिथून पसार झाला. चार दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बापानं कुऱ्हाडीनं लेकाचा हात तोडला; हात घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला, कारण वाचून थरकाप उडेल
चोरानं मंदिरातून एकूण तीन दानपेट्या लांबवल्या. याशिवाय पुजेसाठी वापरली जाणारी भांडीही चोरली. ही घटना मंदिरातील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे. घटनेचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून तो पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here