जळगाव :जळगाव-पाचोरा रस्त्यावर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनास भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षातील ११ महिन्याचा चिमुकला जागीच ठार झाला असून ९ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगावजवळ हा अपघात झाला आहे. गणेश भगवान सोनवणे (रा. दापोरा, शिरसोली) या चिमुकल्याचा अपघातात मृत्यू झाल्याने जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. (an 11 month old boy lost life in a horrific accident on jalgaon pachora road)

जळगाव येथून प्रवाशी घेवून पाचोऱ्याकडे क्रंमाक – एम. एच. १५ इ. एक्स. १८३२ या क्रमांकाचे वाहन जात होते. या वाहनाला खेडगावजवळ एम. एच. १९ सी. वाय. ९२२३ या क्रमाकांच्या मालवाहू वाहनाने धडक दिली. धडक एवढी जोरदार होती, या अपघातात प्रवाशी वाहन थेट रस्त्याच्या खाली उलटले होते. प्रवासी वाहनात शिरसोली येथून भडगाव येथे रक्षाबंधनासाठी जाण्यासाठी अनिता भगवान सोनवणे या बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा गणेश हा ११ महिन्यांचा चिमुकला सुध्दा होता. वाहनात बसल्यावर काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला. यात वाहनाखाली दबल्या जावून चिमुकला गणेश सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी अनिता सोनवणे यांचा मनहेलावणारा असा आक्रोश केला.

डॉक्टर तरुणीचे बनावट व्हॉट्सअप चॅटिंग बनवले, फोटोसह पाठवले होणाऱ्या नवऱ्याला; पुढे घडले ते धक्कादायक
चालकासह वाहनातील नऊ प्रवासी जखमी

तसेच या अपघातात वाहनाचे चालक भैय्या कोळी रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा, तसेच प्रवासी अनिता पवन चव्हाण (वय – ३८) रा. कोकडी तांडा ता. पाचोरा, सुशिलाबाई धनराज राठोड (वय – ३८) रा. रामदेववाडी ता. जळगांव, विकास सुरेश पवार (वय – २७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, आदित्य विकास पवार (वय – ७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, अनिता भगवान सोनवणे (वय – २२) रा. दापोरा (शिरसोली), लता गोकुळ राठोड (वय – ३७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, ऋषीकेश प्रदिप पंडित (वय – १६) रा. लासगाव ता. पाचोरा व निकीता गोकुळ राठोड (वय – १४) रा. रामदेव वाडी ता. जळगांव हे ९ जण जखमी झाले आहेत.

मातेनेच बाळाला नाल्यात फेकलं, तपासात आणखी एक धक्कादायक गुन्हा उघड, पोलीस सुन्न
मालवाहू वाहनावरील चालक पोलिसांच्या ताब्यात

अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, समीर पाटील, संदिप भोई व योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात हलविले तसेच वाहतूक सुरळीत केली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मालवाहू वाहनावरील चालकास पाचोरा पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
रात्री घरातून गेला तो सकाळी शेतात मृतदेहच सापडला, डोक्यावर आणि शरीरावर असंख्य वार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here