Issue of opposition Leader : महाविकासा आघाडीतील पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ पाहता जवळपास सर्व सामान आहेत, असे दिसते. त्यामुळे काँग्रेसलाच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद देणे आवश्यक आहे. या बाबत उद्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही आणि हा आमचा आक्षेप असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले. आम्ही जर मित्र आहोत, आमची जर आघाडी आहे तर एकामेकांशी बोलले पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेतर्फे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची शिफारस करणारे पत्रत विधान परिषदेच्या सभापतींना लिहिले आहे. सध्या विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त असल्याने त्याचे सर्व अधिकार उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहेत. शिवसेनेचे उपनेत आणि खासदार अरविंद सावंत यांनी हे पत्र काल सुपूर्द केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.